चंद्रपूर : सध्या माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे सर्वदूर पसरत आहे. डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण भागात देखील माहितीची देवाणघेवाण होऊ लागली आहे. या निमित्ताने अनेक नोकरीच्या संधी मोठ्या शहरात उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपूर सारख्या दुर्गम असलेल्या शहरांमध्ये शिक्षण आणि नोकरी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने “याह” संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हब साकारण्यात येणार आहे.
देशभरातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये चंद्रपूर शहरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या महत्त्वाच्या विषयावर संधी उपलब्ध नसल्याने इथल्या तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे अनेक अनुभव आजवर चंद्रपूरकरानी कथन केले आहे. युवकांना दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जायचे कि नाही या निर्णयाला एक पर्याय या निमित्ताने उपलब्ध व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आयटी क्षेत्रातील काही महत्वाचे भाग चंद्रपुरात सुरु करण्याचा मानस घेऊन पुढाकार घेत आहोत. यात नागरिक आणि युवाचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. आय टी मध्ये दिवसेंदिवस येणाऱ्या गॅझेट्स बद्दल सर्व माहीती मिळावी, माहिती व तंत्रज्ञान पारंगत होण्यासाठी अनेक महत्त्वाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल शिकण्यासाठी डायरेक्ट सर्व्हर्सवर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.
होस्ट झोर्बा होस्टिंग प्रोव्हाइडर च्या मदतीने एक नवी आशा आणि दिशा चंद्रपुरातील युवा पिढीला मिळेल.
चिप होस्टिंग पुरवणे, शेअर होस्टिंग, व्हीपीएस, डेडिकेटेड सर्व्हर्स, २४/७ सर्वर मॅनेजमेन्ट सर्विसेस, सर्वर मॅनेजमेन्ट सर्विसेस बद्दलचे ट्रैनिंग, सर्वर ऍडमिनिस्ट्रेशनचे ट्रैनिंग, विंडोज सर्वर मॅनेजमेन्ट, लिनक्स सर्वर मॅनेजमेन्ट, वेब होस्टिंग ऍडमिनिस्ट्रेशन, मेल सर्वर ऍडमिनिस्ट्रेशन, होस्टिंग कंट्रोल पॅनेल्स, व्हर्च्युअलायजेशन, क्लस्टर टेक्नॉलॉजि, व्हर्च्युअलायजेशन कंट्रोल पॅनेल्स, या संबंधित सर्विसेसचे तज्ञाकडून ट्रैनिंग उपलब्ध करणार आहोत. अधिक माहिती साठी https://hostzorba.com/training-education/ दिलेल्या लिंक वर संपर्क करावा असे आवाहन “याह” तर्फे करण्यात आले आहे.
आय टी क्षेत्रातील टेक्निकल, नॉन-टेक्निकल नोकऱ्यांचे संदर्भ देखील देण्यात येतील, अशी माहिती हर्षल चिपळूणकर यांनी दिली. संबंधितांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.