शनिवार रवीवार बघुन अगदी गाैंडकालिन परकाेटाला लागुन तसेच पकाटाच्या अगदी जवळ अवैध घर बांधकाम केल्या जात आहे. आणि चंद्रपुर मनपाचे अधिकारी कुंभकर्णी झाेपेत आहे. आयुक्त म्हनाले शनिवार, रवीवार सुध्दा कारवाही करू. मनपाचे कार्य जाहीरात पुरतेच. शहरात शनिवार रवीवारलाच अवैधरित्या बांधकाम जाेमात सरू. अतिक्रमण अधिकारी म्हनताे साह्यक आयुक्त आदेश देतील तरच बांधकाम थांबण्यात येईल. अधिकारी कर्मचारी म्हनतात तक्रार असेल तर कारवाही करू ही भाषा दादा काेंडक्याचा साेंगाड्या चित्रपटाच्या नावापुरतीच खरी ठरते. मग नियम कायदा असुन मात्र तक्रार करून फायदा अतीक्रमण, अवैध घरबांधकाम करणार्याचा हाेताे. मनपा आयुक्त तक्रारी चे फाेन घेत नसतात. तक्रार लेखी करा किंवा ऑनलाईन अँपवर करा कुठलीच कारवाही चंद्रपुर मनपा करत नसते. म्हनुन आज चंद्रपुर शहरालगत अवैध बांधकाम जाेमात हाेतांना दिसुन येते. परकाेटाचे रक्षक सुध्दा धुतराष्ट्रा सारखे अधंत्व असल्यासारखे गप्प आहेत. परकाेटाची देखरेख ही स्वताच्या प्रसिद्धी करिताच असते की काय -? असा प्रश्न आता जनसामान्याच्या चर्चेत हाेतांना दिसताे. सध्या चंद्रपुर महानगरपालिकेत प्रशासक कारभार असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी मनमर्जी प्रमाणे वागतांना दिसतात. या बाबीकडे दुर्लक्ष करणार्यांवर आता स्वता मा.जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण ठेवावे असे चंद्रपुरकरांची मागणी आहे